Thursday, January 27, 2011

गेली हजारो वर्षे गरिबीविरुद्धचा राग कुणी शिकवलाच नाही .
गरिबी बद्दल संताप यावा हि गरिबी मोडून तोडून टाकावी अस
आम्हाला कधी कुणी शिकवलंच नाही.
आम्हाला दैव वाद शिकवला ,
आम्हाला प्रारब्दाची थियरी सांगितली .
आम्हाला कर्म थियरी आणि गत जन्मातील पापपुण्य
याचा या जन्माशी संबंध लावायचं तत्वज्ञान शिकवलं गेल .
मला वाटत हे मोडणं हा सुद्धा गरिबीच्या लढयातील एक भाग आहे .


यशवंतराव चव्हाण

Sunday, January 9, 2011

परिवर्तनवादी विचारवंत

महाराष्ट्राला यशवंतराव मोहिते हे वसंतदादा पाटील यांच्यानंतर लाभलेले बुद्धिवादी , अभ्यासू , सुसंस्कृत आसे नेतृत्व होते.
मात्र त्यांच्या नेतृत्वाची ,विचारांची जेवढी नोंद महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
त्यांना मात्र त्या बद्दल अजिबात खंत नव्हती .असा मनाचा ,विचारांचा मोठेपणा दुर्मिळ असतो.
त्यांच्या ठिकाणी असलेले बुद्धीचे वैभव हाच त्यांचा आनंद होता. समाधान होते.
महाराष्ट्राचा हा बुद्धिवादी सिंह रेठरे बुद्रुक येथील आपल्या घरात अभ्यासात गढून गेलेला असे.
हयातभर अभ्यासूवृत्ती सांभाळणारे हे बहुजन समाजातील दुर्मिळ असे व्यक्तिमत्व होते.

Saturday, January 8, 2011

ज्ञान जरूर हवं , पण त्यानं सहवासात येणाऱ्या माणसांच्या श्वासांना ,
त्यांच्या अस्तित्वाला थोडा  तरी सुखद गंध द्यायला हवा .
ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प न्हवे ,तर सुगंध दरवळायला हवा .

                                                   --    डॉ. आ . ह . साळुंखे